रिफाईंड, फ्री फ्लो मीठाचे दुष्परिणाम

विषारी मीठ खाणे बंद करा - शिव शंकर गुप्ता

कोल्हापूर/ प्रतिनिधी: नावाजलेल्या ब्रँडचे पोटॅशिअम फेरोसायनाइड यासारखे विषारी घटक समाविष्ट असणारे आयोडाइज्ड मीठ नियमित खाल्ल्याने काही दुष्परिणाम झाले आहेत का, याची तपासणी करण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन भारतात विकल्या जाणाऱ्या मीठाच्या प्रमुख ब्रँडमध्ये विषारी घटक समाविष्ट असल्याची समस्या सर्वांसमोर मांडणारे कार्यकर्ते व गोधम ग्रेन्स अँड फार्म्सचे अध्यक्ष शिव शंकर गुप्ता यांनी केले आहे.
'परवानगी असणाऱ्या मर्यादेपर्यंत पोटॅशिअम फेरोसायनाइडचा वापर करत असल्याची कबुली टाटा सॉल्टने नुकतीच दिली आहे. ही मर्यादा काय आहे? त्यांनी कधी ती स्पष्ट केली आहे का?


ते आपल्या पाकिटावर पोटॅशिअम फेरोसायनाइचा उल्लेख का करत नाहीत? फूड अॅडिटिव्हसाठी युरोपीयन स्टँडर्ड नंबर असणाऱ्या आणि सर्वसामान्यांना समजण्यास अवघड असणाऱ्या E536 याचा वापर ते भारतात का करतात?' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
'पोटॅशिअम फेरोसायनाइडचा समावेश असणाऱ्या मिठाचे सेवन लोकांनी करू नये, कारण त्याचा समावेश परवानगीयोग्य प्रमाणात केला असल्याचा दावा कंपन्यांनी केला असला तरी ते विष आहे,' असे त्यांनी सांगितले आणि औषधातील हाच घटक अमेरिका व ग्रेट ब्रिटन येथे निषिद्ध करण्यात आल्याचे सांगितले.
'असे असले तरी, गेली वीस वर्षे ज्यांचे मिठाचे ब्रँड बाजारात अधिराज्य गाजवत आहेत अशा मोठ्या कंपन्या भारतीयांना विष खायला घालत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे,' असे विषारी घटक असणाऱ्या मिठापासून मुक्तता मिळवण्याची मोहीम हाती घेतलेल्या गुप्ता यांनी सांगितले.
परंतु, यास दुसरी बाजूही आहे. मिठाच्या प्रमुख ब्रँडचा सातत्याने वापर केल्याने शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे नुकत्याच करण्यात संशोधनातून दिसून आले आहे. पोटॅशिअम फेरोसायनाइडचा समावेश असणारे आयोडाइज्ड मीठ नियमितपणे वापरणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा अधिक धोका असतो, त्यांना विविध प्रकारचे घातक आजार होऊ शकतात, असे आढळले आहे, असे भारतीय जेमस्टोन उद्योगाचे जनक म्हटले जाणारे गुप्ता यांनी सांगितले.
नियमनात्मक मंडळांचे साटेलोटे आहे, कारण त्यांनी मोठ्या कॉपोरेटना खाद्य मीठ म्हणून व्हॅक्युम सॉल्ट किंवा प्रोसेस्ड सॉल्ट यांची विक्री करण्याची परवानगी दिली आहे, असा आरोप गुप्ता यांनी केला. यास मीठ म्हणता येणार नाही आणि ते नैसर्गिक मिठापेक्षा अतिशय निकृष्ट प्रतीचे असते, असे त्यांनी नमूद केले.

विषारी मीठ खाणे बंद करा - शिव शंकर गुप्ता

(वरील लिंक ला क्लिक करा.)




Comments

Popular Posts