सैंधव मिठाची माहिती
साभार: मुखपृष्ठ » चतुरंग सहज आयुर्वेद – मीठ शेंदेलोण (सैंधव), पादेलोण, बीडलवण, सांबरलोण आणि दर्याई मीठ असे आयुर्वेदामध्ये मिठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. admin |डॉ. शारदा महांडुळे शेंदेलोण (सैंधव), पादेलोण, बीडलवण, सांबरलोण आणि दर्याई मीठ असे आयुर्वेदामध्ये मिठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये सैंधव(मिठा)चा वापर करतात. स्वयंपाकघरात, तर कुठल्याच अन्नपदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही. त्यामुळे अन्नपदार्थामध्ये याचे महत्त्वाचे स्थान आहे. परंतु याच्या अतिवापरामुळे विविध आजारांची लागण होऊन जीवन बेचव होऊ शकते, म्हणून सावध रीतीने मिठाचा आहारात वापर करावा. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण (मीठ) असे म्हणतात. आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरातील वापरावयाचे मीठ हे सामान्यत: समुद्रातून मिळविलेले असते. गुणधर्म- मीठ हे अग्नी प्रदीप्त करणारे धातुवर्धक, कृमिनाशक, रुचीकारक बल्य असते. परंतु त्याचा वापर हा योग्य प्रमाणातच करावा. ते अजीर्ण, उदरशूळ (पोटदुखी) व गॅसेस या विकारांवर उपयुक्त असते. स्वच्छ चम...